loader
Breaking News
Breaking News
Foto

वाडा हायस्कूलमध्ये सिंधूकन्या प्रभाग संघ पडेलची सभा संपन्न

देवगड (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सिंधूकन्या प्रभाग संघ पडेलची सभा वाडा हायस्कूलच्या सभागृहात पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुयोगी घाडी, पंचायत समिती सदस्य अंकुश ठूकरुल, पंचायत समिती सदस्या संजना लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत सभापती गणेश राणे यांनी उमेद अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्वयंसहायता समूहांनी एकत्रित येऊन महिलांच्या उपजीविकेत वाढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वयंसहायता समूहांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांच्या घरावर सौर यंत्रणा बसविण्यास इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांना प्रभाग संघाच्या स्तरावरून कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना सभापती गणेश राणे यांनी दिल्या. तसेच सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीचा विचार करता स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध करून दिल्यास तो योग्य हमीभावाने खरेदी करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

यावेळी आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजनेअंतर्गत सिंधूकन्या प्रभाग संघास प्राप्त झालेल्या मालवाहू वाहनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वाहनाच्या माध्यमातून प्रभाग संघाच्या उपजीविका व आर्थिक उपक्रमांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमास तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, सिंधूकन्या प्रभाग संघ पडेलचे सर्व पदाधिकारी, प्रभाग संघ व्यवस्थापक तसेच अभियानाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg