loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली पंचायत समिती येथे ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियान कार्यशाळा संपन्न

दापोली (वार्ताहर) : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, दापोली यांच्या वतीने ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत कार्यशाळेचे आयोजन आज पंचायत समिती सभागृह, दापोली येथे करण्यात आले. या कार्यशाळेचा शुभारंभ पंचायत समिती दापोलीचे सभापती उन्मेष राजे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यशाळेला जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई व साधना महाजन, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, संदीप चिखले, सुचिता महाडिक व सुवर्णा खळे, तसेच गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यशाळेत ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची उद्दिष्टे, गावपातळीवरील आरोग्यविषयक उपक्रम आणि लोकसहभागातून गाव अधिक आरोग्यसंपन्न करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आरोग्य हा विषय सर्वांच्या दैनंदिन चर्चेतील झाला पाहिजे तरच सर्व नागरिक त्यावर गांभीर्याने विचार करुन कृती करतील असे. सभापती उन्मेष राजे यांनी सांगितले. अभियानाचे ध्येय व उद्दिष्ट माहीती करुन घेऊन त्यानुसार अमलबजावणी करावी, असे जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य विषयक सर्व सेवा सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे उपलब्ध होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे मत जिल्हा परिषद सदस्य साधना महाजन यांनी व्यक्त केले. हे अभियान सर्वांनी व्यवस्थित समजुन घेऊन त्याप्रमाणे सर्व उपक्रम राबविण्यात यावे, असे मत गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

या कार्यशाळेस तालुक्यातील सरपंच तथा प्रशासक, ईतर विभागाचे खाते प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत, गाव पातळीवरील सर्व विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून आरोग्यदायी गाव निर्माण करण्यासाठी या अभियानाला विशेष महत्त्व द्यावे, असे सर्व मान्यवरांनी सांगितले. सर्व नागरिकांनी आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार विहार व तणावमुक्त जीवनशैली आचरणात आणावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच दापोली तालुक्याला या अभियानात जास्तीत जास्त पारितोषिक मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने नियोजन पूर्वक कामकाज करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg