loader
Breaking News
Breaking News
Foto

नाणीजधाम येथे आजपासून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ! दिंड्यांचे आगमन

नाणीजधाम, : जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सव सोहळ्याला श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील सुंदरगडावर आज, मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर दिवशी जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविक नाणीजधाममध्ये दाखल होऊ लागले असून, सुंदरगडावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक विधी, देवदेवतांना निमंत्रण देणार्‍या मिरवणुका, सप्तचिरंजीव महामृत्युंजय याग, प्रवचन आणि अभिष्टचिंतन सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने तीन नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार असून, त्यामध्ये एका कार्डियाक रुग्णवाहिकेचाही समावेश आहे. जागतिक तापमानवाढीमुळे निर्माण होणार्‍या पर्यावरणीय समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून सलग चौथ्या वर्षी वसुंधरा पायी दिंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर, तेलंगणा, परभणी, नाशिक, पुणे, मुंबई आणि गोवा अशा सात ठिकाणांहून या दिंड्या श्रीक्षेत्र नाणीजधामच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. सोमवार आणि मंगळवारी टप्प्याटप्प्याने या दिंड्या नाणीजधाममध्ये दाखल होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक हातात घेऊन चालणारे पदयात्री, विविध रंगांचे ध्वज, विशिष्ट गणवेश, टाळ-मृदंगाचा गजर आणि अखंड नामजप अशा भक्तिमय वातावरणात या दिंड्यांचे मार्गक्रमण सुरू आहे. वृक्षारोपण, निसर्गसंवर्धन आणि जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याचा संदेश या दिंड्यांच्या माध्यमातून गावोगावी पोहोचविण्यात येत आहे. या पायी दिंडी फक्त ग्लोबल वार्मिंग जनजागरण करत येत नाही तर वाटेमध्ये येणार्‍या गावांमध्ये समाजातील वेगवेगळे मान्यवरांना घेऊन वृक्षारोपण सुद्धा करत करत आहेत. ग्लोबल वार्मिंग संकट कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी हा या दिंडीचा प्रमुख उद्देश आहे. जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे अनुयायी फक्त जनजागरण करत नाहीत यावर्षी अवघ्या पंधरा दिवसात सहा लाख १८ हजार नऊ झाडे लावून वृक्षारोपण कार्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठे योगदान दिलेले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते एक मिनिटात महामार्गावर ३००० झाडे लावण्याचा विक्रम सुद्धा या अनुयायाने केलेला आहे.

टाईम्स स्पेशल

बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा जन्मोत्सव दिन साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी तीन नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार असून, त्यापैकी एक कार्डियाक रुग्णवाहिका आहे. रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणारी ही सर्व सेवा मोफत आहे. सायंकाळी ७.३० वाजता दक्षिण पीठाचे उत्तराधिकारी प. पू. कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर रात्री ८.३० वाजता जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे प्रवचन होईल. यानंतर औक्षण करून अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून दि. २० ते २३ ऑक्टोबर दरम्यान मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा संगम घडविणारा जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा जन्मोत्सव सोहळा श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे उत्साहात साजरा होणार असून, देशभरातील भाविकांसाठी हा सोहळा श्रद्धा आणि आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg