loader
Breaking News
Breaking News
Foto

डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!

पनवेल : डबल महाराष्ट्र केसरी व शिवसेना क्रीडासेना प्रमुख पैलवान चंद्रहार पाटील, हिंदकेसरी पैलवान संतोष आबा वेताळ तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार सेनेचे राज्य चिटणीस लक्ष्मणदादा गायकवाड यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची आज पनवेल येथे सदिच्छा भेट घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पैलवानांच्या उपस्थितीमुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कुस्तीच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेत सदिच्छापूर्ण संवाद साधला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पैलवानांचे स्वागत केले. तसेच पैलवानांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार केला. यावेळी कामोठे मंडल सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, मंडल उपाध्यक्ष उत्तम नाना जरग आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg