loader
Breaking News
Breaking News
Foto

डेरवण हॉस्पिटलकडे जाणारा रस्ताच बनलाय मृत्यूचा सापळा

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - सावर्डे येथून पंत वालावलकर रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्याची अवस्था अधिक बिकट असून वर्षानुवर्षे या रस्त्याची ही अवस्था जैसे थे असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. चिपळूण तालुक्यातील अद्ययावत अशा वालावलकर रुग्णालयात केवळ रत्नागिरी जिल्ह्यातूनच नव्हे तर सिंधुदुर्गातून देखील रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. परंतु सावर्डे ते डेरवण हॉस्पिटल पर्यंतचा रस्तावर अक्षरशः मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहने आपटण्याचे प्रमाण अधिक आहे. अत्यवस्थ रुग्णाला घेऊन, वेगाने रुग्णालयाकडे येणार्‍या रुग्णवाहिका खड्‌ड्यात आपटत जातात याचाही त्रास रुग्णांना होत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे गाड्यांच्या रहदारी मुळे सर्वत्र धुळीचे लोट पसरत आहेत. तालुक्यातील असे महत्वाचे रस्ते किमान तात्काळ दुरुस्त होण्याची गरज आहे. या रस्त्याच्या नादुरुस्ती बाबत येथे येणारा प्रत्येक नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. सावर्डा ते डेरवण हॉस्पिटल हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे नादुरुस्त बनत चालल्याची स्थिती आहे. या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करावे अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg