loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्ह्य खो-खो संघाचे विभागीय स्पर्धेत पेडणेकर विद्यालय करणार नेतृत्व

केळंबे-लांजा, (सिराज नेवरेकर) - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हातरीय १४ वर्षे वयोगट शालेय खो-खो स्पर्धा डेरवण येथे संपन्न झाल्या. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेच्या मुलांनी गतवर्षीच्या विजयाची परंपरा कायम राखत जिल्हा स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकावले असून विभागीय स्पर्धेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१७ वर्षाखालील मुलांचा संघ अंतिम फेरीत स्थान पटकावून अंतिम सामन्यात संघ उपविजेता ठरला. खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख गणेश झोरे, विजय पाटोळे, सुशील वासुरकर, चेतन सनगले, दिपक धावडे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडू व मार्गदर्शक यांचे तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईचे अध्यक्ष डॉ.आनंद जगन्नाथ पेडणेकर व पदाधिकारी मुंबई कमिटी, स्थानिक कमिटी पदाधिकारी, शाळा समिती पदाधिकारी पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून कोल्हापूर विभागीय स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg