loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत सिनजी पंपावर गाड्यांच्या रांगा

रत्नागिरी (जमीर खलफे) - दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांची वाढती गर्दी आणि अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे रत्नागिरीत सीएनजीचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन पर्यटन हंगामात गॅसचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील सर्वच सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तासनंतास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने पर्यटक, स्थानिक रहिवासी, नोकरदार आणि रिक्षा व्यावसायिकांना मोठा आर्थिक व मानसिक फटका बसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवाळी पाडवा आणि भाऊबीज सण साजरा केल्यानंतर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक चारचाकी व मिनीबसच्या माध्यमातून रत्नागिरी, गणपतीपुळे, या समुद्रकिनारी भागांत मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मात्र, या वाढत्या गर्दीच्या तुलनेत गॅसचा पुरवठा कमी पडत असल्याने जिल्ह्याची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी शहरातील माळनाका, एमआयडीसी जे. के. फाईल्स, हातखंबा, पंपांवर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. अनेक पंपांवर 'सीएनजी संपले' असे फलक लावले जात असल्याने तासन्तास रांगेत उभ्या असलेल्या चालकांचा हिरमोड होत असून, रिफिलिंगच्या गाड्या येईपर्यंत अनेक चालक पंपावरच ताटकळत थांबून आहेत.

टाईम्स स्पेशल

सणासुदीच्या आणि पर्यटनाच्या हंगामात सीएनजीची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पंप चालकांनी वेळीच योग्य नियोजन करणे गरजेचे होते. परंतु, दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐन हंगामात गॅस भरण्यासाठी एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लावाव्या लागत असल्याने स्थानिक नागरिक आणि चाकरमानी चांगलेच हैराण झाले आहेत. या टंचाईचा सर्वाधिक आर्थिक फटका रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि दापोली भागांतील स्थानिक रिक्षाचालकांना बसत असून, प्रवासी वाहतुकीऐवजी त्यांचा सर्वाधिक वेळ पंपावरील रांगेतच वाया जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg