संगलट (इक्बाल जमादार) – महावितरणच्या खेड तालुक्यातील खारीपट्टा विभागामधील कर्जी शाखा कार्यालयात दिवाळीनिमित्त आयोजित स्नेहमेळावा उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला. आकर्षक आकाशकंदील आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आलेल्या कार्यालयात शाखेतील कायमस्वरूपी तसेच बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांनी एकत्र येत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. या स्नेहमेळाव्यातून कर्मचाऱ्यांमधील एकी, बंधुभाव आणि सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जोगळे यांनी वीज क्षेत्रात काम करताना सुरक्षिततेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले. दीपक लटके यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून एकत्रितपणे काम केल्यास कोणत्याही संकटावर सहज मात करता येते, असे सांगितले.
बाह्यस्रोत कर्मचारी प्रथमेश बहुतले यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांची मने जिंकली. पूर्वी अंगणात पणत्या लावून दिवाळी साजरी केली जात होती; मात्र आज प्रत्येक घर विद्युत रोषणाईने उजळत आहे. ही रोषणाई अखंडित ठेवणे आणि ग्राहकांना वीजसेवा देणे, हीच आमची खरी दिवाळी असल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. योगेश लिंगायत यांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार कर्मचाऱ्यांनीही स्वतःला अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. कंपनी स्मार्ट होत असताना कर्मचाऱ्यांनीही स्मार्ट पद्धतीने काम करावे. तसेच कंपनीच्या नियमांची अचूक माहिती असणे हीच सुरक्षित कामाची खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना पुरुषोत्तम लिंगायत यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षेबाबत मोलाचा संदेश दिला. कामातील छोटीशी चूक संपूर्ण कुटुंबासाठी मोठे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे आवश्यक सुरक्षा साधनांशिवाय काम करू नये. काम करताना अडचण निर्माण झाल्यास एकट्याने धाडस न करता सहकाऱ्यांची मदत घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी त्यांनी आजवर शाखा कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढविले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची गोड सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश लिंगायत यांनी प्रभावीपणे केले. महावितरणच्या कर्जी शाखेतील या स्नेहमेळाव्याने केवळ दिवाळीचा आनंदच साजरा केला नाही, तर कर्मचारी एकजूट, सुरक्षितता आणि ग्राहकसेवेचा वसा जपण्याचा प्रेरणादायी संदेशही दिला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.