loader
Breaking News
Breaking News
Foto

दत्तक पालक संघ रिंगणे कोंडगावच्या वतीने आयोजित बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम उत्साहात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - दत्तक पालक संघ रिंगणे कोंडगावच्या वतीने आयोजित बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम नुकताच रिंगणे येथे उत्साहात पार पडला. सेवानिवृत्त शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता असलेल्या सिताराम सांडम यांनी 1994 मध्ये रिंगणे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी दत्तक पालक संघ रिंगणे कोंडगावची स्थापना केली. त्यानंतर परिसरातील तीन माध्यमिक शाळा आणि मराठी शाळा येथील विद्यार्थ्यांना सतत शैक्षणिक साहित्य पुरवले जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्याचा घेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते. म्हणूनच दत्तक पालक संघ रिंगणेच्या वतीने यावर्षीपासून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यानुसार हा कार्यक्रम 22 नोव्हेंबर रोजी संघाच्या कार्यालयात रिंगणे येथे पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुणबी पतसंस्था लांजा चे उपाध्यक्ष विलास दरडे तसेच सेक्रेटरी संदीप डाफळे हे उपस्थित होते. मान्यवर आणि प्रमुख अतिथी यांच्या हस्ते लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी दत्तक पालक संघ रिंगणे कोंडगाव ने सुरू केलेले कार्य सर्वांना दिशादर्शक ठरणारे आहे. गरीब व हुशार मुलांसाठी आधारवड ठरत असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे उपाध्यक्ष काशिनाथ चव्हाण, सरचिटणीस गौतम जाधव, विजय पाष्टे दत्ताराम गाडे, शांताराम धुळप, शिवाजी रावणक, भिकाजी सांडम, चंद्रकांत वाडेकर, गोरड गुरुजी यांनी मेहनत घेतली. अंजनारी येथील गणेश जोशी यांनी भोजनाची व्यवस्था केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोंडके हायस्कूलचे शिक्षक अनिल कदम यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg