loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली, खेड व मंडणगडच्या विकासाचा धडाका! दापोलीत पत्रकार परिषदेत योगेश कदम यांनी मांडला विकासकामांचा लेखाजोखा!

दापोली (वार्ताहर) : दापोली, खेड व मंडणगड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत ३० नळपाणी योजनांना गती देण्यात आली असून येत्या दुष्काळजन्य परिस्थितीत एकाही गावाला पाण्याचा तुटवडा भासू दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. तसेच लाडघर बीचला 'ब्लू फ्लॅग'चा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी ८ कोटींचा निधी, दापोलीतील नाट्यगृहासाठी एकूण २२ कोटींचा निधी आणि दापोलीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी केलेला पाठपुरावा तसेच दापोलीमध्ये सद्यस्थितीमध्ये चालू असलेल्या विकास कामांचा आढावा याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दापोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण कोकणाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे मुख्य ध्येय असून याच दृष्टिकोनातून सर्व कामे केली जात आहेत असे योगेश कदम यांनी यावेळी सांगितले. कोकणातील पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट मॉडेल राबविण्याचे नियोजन आहे. यामध्ये रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी असलेल्या गावांचा पर्यटनातून विकास करण्यासाठी आराखडा करण्यात येणार आहे. उन्हवरे येथील गरम पाण्याच्या कुंडाचा विकास तसेच पर्यटकांना किमान तीन दिवस मुक्काम करता येईल, अशा सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

खेड-दापोली रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना रस्त्याची मूळ रुंदी कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. हर्णै बंदराचे काम तातडीने पूर्ण करणे, २२ कोटी रुपयांचे नाट्यगृह उभारणे, मंडणगड पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दूर करणे तसेच आझाद मैदानावर सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्याच्या कामांनाही गती देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ​या पत्रकार परिषदेला माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg