loader
Breaking News
Breaking News
Foto

रायपाटण येथे नदीवर मासेमारीसाठी गेलेल्या प्रौढाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; परिसरात हळहळ

राजापूर (तुषार पाचलकर): राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास पत्नीसह नदीवर मासेमारीसाठी गेलेल्या एका ६० वर्षीय प्रौढाचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बाजीराव रावजी साबळे (वय ६० वर्षे, रा. रायपाटण, ता. राजापूर) असे मयत व्यक्तीचे नाव असून, या आकस्मिक घटनेमुळे रायपाटण परिसरावर शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, बाजीराव साबळे हे २१ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीसह रायपाटण येथील नदीवर मासे पकडण्यासाठी गेले होते. नदीकिनारी असतानाच त्यांच्या छातीत अचानक असह्य वेदना सुरू झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांच्या पत्नीने आरडाओरड करून आजूबाजूच्या ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावले. स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत साबळे यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून, या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg