loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांची गोशाळेला भेट, गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त

साटेली भेडशी, : वसुबारस सणाचे औचित्य साधून साटेली भेडशी येथील श्री सातेरी जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी साटेली येथील द्वारकानाथ गणपत्ते यांच्या गोशाळेला भेट दिली. भारतीय संस्कृतीत गायीला अनन्यसाधारण महत्त्व असून,गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे वसुबारस. यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी गोशाळेतील गाय व वासरांचे विधिवत पूजन करून त्यांना गोडधोड खाऊ घातले. विद्यार्थीही या उपक्रमात मोठया उत्साहाने सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

'गोमातेचे पूजन, प्राणीमात्रांवर प्रेम आणि संस्कारांचे जतन' हा या उपक्रमामागील उदेश होता. गाईंचे धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व पर्यावरणीय महत्त्व विद्यार्थ्यांना समजावणे. विद्यार्थ्यांमध्ये प्राणीमात्रांविषयी प्रेम, दया व करुणा निर्माण करणे,निसर्ग संवर्धनाची भावना रुजविणे यासाठी विद्यार्थ्यांना गोशाळेत नेण्यात आले होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील सण-परंपरांची माहिती देण्याबरोबरच मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याचा आणि त्यांचे संगोपन करण्याचा अनमोल संदेश देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg