दापोली (वार्ताहर) : दशानेमा गुजर युवक संस्था, दापोली (रजि.) यांच्या वतीने दसऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन भोंडला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांतील एकूण 89 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पारंपरिक भोंडल्याची परंपरा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवले. या स्पर्धेत चेतना विनोद घोडेराव यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर माधुरी राजेश सावंत यांनी द्वितीय आणि वैदेही विनायक जोशी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये सजेली मितेश बुटाला यांनी प्रथम, तर दीपा राजेश साबळे यांनी द्वितीय उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.
स्पर्धेचे परीक्षण संजय महाकाळ सर आणि सुजाता दाभोळे यांनी केले. स्पर्धकांनी सादर केलेल्या भोंडल्याची रचना, फुलांची आकर्षक सजावट आणि कलात्मक मांडणी या बाबींच्या आधारे परीक्षण करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, उपाध्यक्ष निकेत मेहता, कार्याध्यक्ष ऋषिकेश तलाठी, सचिव मयुरेश शेठ, खजिनदार स्वप्नील मेहता, प्रकल्प संचालक अमित मेहता, प्रा. तेजस मेहता, सीए ऋषिकेश शेठ, पार्थ साबळे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
ऑनलाइन माध्यमातून आयोजित केलेल्या या स्पर्धेला तीन तालुक्यांमधून मिळालेला प्रतिसाद संस्थेसाठी उत्साहवर्धक ठरला. अशा उपक्रमांच्या माध्यमातून पारंपरिक सणांचे महत्त्व जपण्यासोबतच समाजातील नागरिकांना एकत्र आणण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, विजेत्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.