loader
Breaking News
Breaking News
Foto

एक दिवस गावासाठी! तेरेवायंगणी येथे स्वच्छता अभियान व वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम उत्साहात

दापोली ( प्रतिनिधी ) - शिवनेरी शिक्षण संस्था संचलित कै. कमलाकर जनार्दन तथा भाई जावकर विद्यामंदिर, तेरेवायंगणी, ता. दापोली आणि ग्रामपंचायत तेरेवायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवासंकल्प अभियान’ अंतर्गत ‘एक दिवस गावासाठी’ हा उपक्रम शुक्रवारी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान आणि वनराई बंधारे बांधण्यासाठी श्रमदान करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात विद्यार्थी व ग्रामस्थांच्या शिवार फेरीने झाली. यावेळी गावातील प्रमुख रस्ते, पायवाटा, पाणवठे तसेच प्रमुख धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे श्रमदान करून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश दिला. या श्रमदान उपक्रमासाठी ग्रामपंचायत तेरेवायंगणीच्या प्रशासक तथा शिक्षण विस्तार अधिकारी निशा देसाई, ग्रामविकास अधिकारी श्रीमती पावसकर, आजी-माजी सरपंच, महिला, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg