loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत कोजागिरीच्या पूर्वसंध्येला २४ ऑक्टो. रोजी काव्यमैफल रंगणार,काव्यरसिकांना मेजवानी

रत्नागिरी :रत्नागिरीतील श्रीराम मंदिराचे प्रांगणात सालाबादप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शनि. दि. २४ ऑक्टो. २०२६ रोजी ‘कोजागिरी काव्य मैफल’ हा बहादरदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच कोकणातीलही नामवंत व नवोदीत कवींनी यामध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्रीराम मंदिर देवस्थान व श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या विद्यमाने हा ‘काव्यमैफल’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.ही ‘काव्यमैफल’ कोजागिरीचे पूर्वसंध्येला म्हणजे शनि. दि. २४ ऑक्टो. २०२६ रोजी सायं. ठिक ४.३० वा. श्रीराम मंदिर सभागृह, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे मोठ्या थाटामाटात संपन्न होईल. या ‘काव्यमैफल’ सोहळ्याचे आयोजन प्रथितयश साहित्यिक व कवी डॉ. दिलीप पाखरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून त्यासाठी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना आपले सहकार्य देऊ केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ‘काव्यमैफल’ मध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. ही ‘काव्यमैफल’ सर्व वयोगटाच्या कवी व कवियित्रींना खुली राहील. रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर मुंबई व कोकणातील नामवंत व नवोदीत कवी या ‘काव्यमैफल’ मध्ये सहभागी होऊ शकतात. सर्व उपस्थित कवीवर्यांना आपली स्वरचित कवीता यावेळी व्यासपीठावरुन वाचून दाखविण्याची संधी मिळते. मराठी भाषेतील तसेच हिंदी, इंग्रजी व उर्दू अशा कोणत्याही भाषेतील काव्य सादर करता येईल.या ‘काव्यमैफल’ मध्ये कवीवर्यांना विविध प्रकारचे काव्य, प्रेम काव्य, बाल काव्य, निसर्ग काव्य, विनोदी काव्य, उद्बोधनपर काव्य, गझल तसेच विडंबन काव्य, हायकू असे विविध प्रकारचे काव्य यावेळी व्यासपीठावरुन सादर करण्याची संधी देण्यात येईल. यापैकी उल्लेखनीय कवीतांना वृत्तपत्रातून प्रसिद्धी देण्याचाही प्रयत्न करण्यात येईल. या ‘काव्यमैफल’ कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार्‍या सर्व कवींना, कवयित्रींना, चोखंदळ काव्य रसिकांना व सार्‍या उपस्थितांना आगमन होताच गरमागरम चहा देऊन स्वागत केले जाईल. ‘काव्यमैफल’ बराच वेळ रंगते त्यामुळे सर्व कवींना व उपस्थितांना गरमागरम चविष्ट अल्पोपहार तसेच कोजागिरीनिमित्त गरमागरम मसाला दूध देण्यात येणार असल्याचे डॉ. दिलीप पाखरे यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

या ‘काव्यमैफल’ मध्ये सर्व नामवंत व नवोदीत कवीवर्यांनी सहभागी व्हावे तसेच यावेळी सर्व चोखंदळ काव्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहून या ‘काव्यमैफली’चा आनंद घ्यावा असे आवाहन ‘काव्यमैफल’ संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाखरे यांनी केले आहे.या ‘काव्यमैफल’ मध्ये नवोदीत तसेच नामांकीत सर्वच कवीवर्यांना सहभागी होता येईल. त्यांना स्वरचित कविता व्यासपीठावरुन सादर करण्याची संधी मिळेल. कवीवर्यांनी आपली नावनोंदणी मंगळ. दि. २० ऑक्टो. २०२६ पर्यंत संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाखरे (मोबा. ९९७०२०२०४९) यांच्याकडे व्हॉटस्‌ऍप मोबाईलवर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.या ‘काव्यमैफल’ मध्ये सहभागी होणार्‍या सर्व नवोदीत व नामांकीत कवीवर्यांना आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र लगोलग देण्यात येईल. तसेच त्यांच्या सत्काराचा व काव्यमैफलीतील सहभागाचा फोटो संबंधित कविवर्यांना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे याबाबत माहिती देताना ‘काव्यमैफल’ संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाखरे यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg