loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी कालव्याच्या दुरुस्ती कामाचा मनसेकडून आढावा; ३१ डिसेंबरची मुदत पाळण्याचे ठेकेदाराला निर्देश

तिलारी (प्रतिनिधी) : तिलारी कालव्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून, या कामाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज साटेली भेडशी येथील भोमवाडी परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेत ठेकेदाराला निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या पाहणीदरम्यान ठेकेदाराने तिलारी कालव्याच्या दुरुस्तीचे काम ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, केवळ काम पूर्ण करण्याची घाई न करता त्याचा दर्जाही उत्तम राखावा. कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा निकृष्टपणा खपवून घेतला जाणार नाही, असे मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या राज्यभरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अशा परिस्थितीत तिलारी कालव्याच्या दुरुस्तीला विशेष महत्त्व आहे. कालव्याचे काम रखडल्यास त्याचा फटका स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना बसू शकतो. त्यामुळे ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी ठाम भूमिका मनसेतर्फे मांडण्यात आली. ३१ डिसेंबरपूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले असले, तरी दिलेल्या मुदतीचे पालन झालेच पाहिजे. अन्यथा मनसे स्टाईलने हिसका दाखवण्यात येईल, असा सज्जड इशाराही पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. या पाहणीवेळी मनसेचे उपतालुकाध्यक्ष लक्ष्मण कुबल, दोडामार्ग शहराध्यक्ष मधुसूदन खांबल, प्रकाश गवस आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg