loader
Breaking News
Breaking News
Foto

पाचल येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

पाचल (सुरेश गुडेकर) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज शिवसेना पाचल विभाग मध्यवर्ती कार्यालय, पाचल येथे त्यांना आदरांजली अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना विभागप्रमुख विलास नारकर, ज्येष्ठ पत्रकार नारायण पांचाळ, विभाग संघटक अनंत कोलते, दिवाळवाडी शाखाप्रमुख राजेश (पप्पा) सुतार, पाचल रिक्षा संघटनेचे अध्यक्ष जयंत धावडे, उपविभागप्रमुख नितेश सावंत, राजापूर उपतालुका अधिकारी ओंकार नारकर, पाचल रिक्षा संघटनेचे सचिव विलास जाधव, पाचल युवासेना उपविभाग अधिकारी मनोज श्रीकृष्ण सार्दळ, कट्टर शिवसैनिक प्रवीण नारकर, पप्पू सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थितांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी अभिवादन केले. शिवसेना पाचल विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसैनिक व युवासैनिकांची उपस्थिती लाभली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg