loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

देवळे (प्रकाश चाळके) - रत्नागिरी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच आरोग्य व बांधकाम सभापती शिवसेना जिल्हा परिषद गटाचे गटनेते विलास चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 26 नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दाभोळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहात विलास चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवार दिनांक 26 रोजी सकाळी 9.30 वाजता साखरपा आरोग्य केंद्रात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी 10:30 वाजता साखरपा येथील नंबर 2 केंद्राच्या विविध स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धा मुळशी शाळा नंबर 1 येथे होणार आहेत. साखरपा शाळा नंबर एक येथे सकाळी 10.30 वाजता बीटस्तरीय. इयत्ता 7 व, 4थी शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात येणार आहे, याची नोंद शिक्षक वर्गाने घ्यावी. तसेच दाभोळे केंद्र शाळा येथे उपविभाग प्रमुख काशिनाथ सकपाळ यांच्यामार्फत खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. चाफवली येथे विलास चाळके यांच्या निवासस्थानी दिनांक 26 रोजी सायंकाळी सात वाजता भव्य दिव्य अशा वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg