loader
Breaking News
Breaking News
Foto

तळवलीत मिशन बंधारे मोहिमेचा सभापती- उपसभापतींच्या हस्ते शुभारंभ

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - यावर्षी पावसाने लवकर पाठ फिरवल्याने तालुक्यात भविष्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे.भविष्यातील पाणीटंचाईचे हे संकट लक्षात घेऊन ही पाणी टंचाईची तीव्रता कशी कमी करता येईल यासाठी गुहागर पंचायत समितीच्या वतीने मिशन बंधारे मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेचा शुभारंभ तळवली येथे सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांच्या हस्ते पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. गुहागर तालुक्याला देखील दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईची दाहकता अधिक वाढणार असून ही आगामी काळात तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता कमी व्हावी यासाठी गुहागर पंचायत समिती स्तरावर मिशन बंधारे मोहीम राबवून "पाणी अडवा पाणी जिरवाचा नारा" बुलंद करण्याचा निर्णय सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. याच अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बंधारे मोहीम राबविली जाणार असून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

शुक्रवारी तळवली भेळेवाडी येथील नदीवर बंधारे मोहिमेचा शुभारंभ सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण यांच्या पुढाकाराने करण्यात आला. येथील नळपाणी योजनांच्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे.या बंधारा मोहिमेच्या शुभारंभासाठी पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी, भाजप तालुका सेक्रेटरी सचिन ओक, गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे,ग्रामपंचायत प्रशासक एस. बी. बागुल, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे, मंडळ अधिकारी जाधवर, तलाठी भिसे, सामाजिक कार्यकर्ते मयुरेश भागवत, पत्रकार आशिष कारेकर, प्रदीप चव्हाण,मंगेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण, भेळेवाडी अध्यक्ष शशिकांत किंजळे, उपाध्यक्ष संदीप शिगवण, सचिव गुरुनाथ कारेकर तसेच आगारवाडी पूर्व व भेळेवाडी येथील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg