हातीव, : संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निवारणासाठी आणि जलसंधारणाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी तालुका संघटना, शाखा संगमेश्वर यांच्या वतीने बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत हातीवच्या कार्यक्षेत्रात 3 वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. ग्रामपंचायत अधिकारी आपल्या दैनंदिन शासकीय कामकाजाच्या व्यापातून वेळ काढून जलसंधारणाच्या सामाजिक कार्यासाठी एकत्र आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या उपक्रमाला पंचायत समिती संगमेश्वरच्या सभापती शर्वरी वेले, उपसभापती प्रफुल्ल बाईत, जिल्हा परिषद सदस्य नेहा माने, पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, पंचायत समिती संगमेश्वरचे सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय पाटील, विस्तार अधिकारी (पंचायत) शंकर घुले, कृषी विस्तार अधिकारी मधुकर कांबळे, हातीव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार कदम आणि ग्रामपंचायत अधिकारी शैलेश खरारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र लोटणकर, रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिपळूणचे चेअरमन अनिल गोपाळ, संचालक सुहास शिंदे, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महिला कौन्सिलर शैला नटे, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सचिव राजेश इंदुलकर, उपाध्यक्ष प्रशांत शेटे, कार्याध्यक्ष नियती चव्हाण, सह सचिव अखिलेश गमरे यांच्यासह तालुका संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि तालुक्यातील महिला व पुरुष ग्रामपंचायत अधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती संगमेश्वरच्या मा. सभापती सौ. शर्वरी वेले मॅडम आणि हातीव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. नंदकुमार कदम यांनी वनराई बंधाऱ्यांमुळे अडवून साठविण्यात आलेल्या पाण्याची पातळी पाहून समाधान व्यक्त केले. तसेच दैनंदिन शासकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळत, पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने केलेले नियोजन आणि प्रत्यक्ष श्रमदानातून राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.
वनराई बंधाऱ्यांमुळे वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होते. त्यामुळे परिसरातील जलसाठा वाढविणे, भूजल पुनर्भरणास हातभार लावणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. “पाणी अडवा, पाणी जिरवा” या जलसंधारणाच्या संदेशाला कृतीची जोड देत ग्रामपंचायत अधिकारी तालुका संघटना, शाखा संगमेश्वर यांनी राबविलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि संघटनात्मक एकजुटीचे उत्तम उदाहरण ठरला आहे. दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून लोकहितासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व सभासदांचे या उपक्रमाच्या माध्यमातून विशेष अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही अशा लोकाभिमुख आणि पर्यावरणपूरक उपक्रमांतून पाणीटंचाई निवारणासाठी ग्रामपंचायत अधिकारी संघटना सक्रिय राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.