सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुक्यात आगामी काळात संभाव्य पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होऊ नये, यासाठी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज विशेष आढावा बैठक घेतली. तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुमारे ७ कोटी रुपयांच्या विविध कामांचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याला लवकरच अंतिम मंजुरी मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार केसरकर यांनी या बैठकीत दिले. तसेच यापुढे तालुक्यात टंचाई भासू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले. चालू वर्षात सावंतवाडी तालुक्यात एकूण २४५१ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस ३४.९३ टक्क्यांनी घटला आहे. 'एल निनो'च्या प्रभावामुळे पाऊस कमी झाल्याने आधीच दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने दिलेल्या अहवालानुसार तालुक्यातील २९ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
आरोस, बादे, बांदा, ब्राह्मणपाट, दांडेली, धाकोरे, गाळेल, इन्सुली, कास, कवठण, क्षेत्रफळ, कुंभार्ली, कुंभारवाडा, मडुरा, माजगाव, मळगाव, नेमळे, न्हावेली, निगुडे, निरवडे, रोणापाल, सातार्डा, साटेली तर्फे सातार्डा, सातोसे, शेर्ले, सोनुर्ली, तळवडे, वेत्ये आणि वाफोली या गावांचा टंचाईच्या यादीत समावेश आहे. परतीचा पाऊस होत असला तरी टंचाईचा धोका लक्षात घेऊन खबरदारी घेतली जात आहे. आवश्यकतेनुसार इतर गावांचाही यात समावेश केला जाईल, असे आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ७ कोटींच्या आराखड्यात महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे: नवीन विंधन विहिरी (बोअरवेल) मारणे व जुन्या विहिरींची विशेष दुरुस्ती करणे. नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती आणि तात्पुरत्या पूरक योजना राबवणे. विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे आणि जलस्रोतांचे बळकटीकरण करणे. प्रगतीपथावरील पाणी योजना जलद गतीने पूर्ण करणे. आवश्यकतेनुसार खाजगी विहिरी अधिगृहीत करणे व टँकरने पाणीपुरवठा करणे. वनराई आणि कच्चे बंधारे बांधण्यावर भर देणे. तालुक्यात सध्या १६९ नळ पाणीपुरवठा योजना, ३०८ हातपंप, १४ दुहेरी पंप आणि ६७७ सार्वजनिक विहिरी अशी पिण्याच्या पाण्याची साधने उपलब्ध आहेत.
या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुधन कवठणकर, मायकल डिसोझा, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, सदाशिव राणे, प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी निलेश जाधव यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद-पंचायत समितीचे इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.