loader
Breaking News
Breaking News
Foto

त्रिपुरी पौर्णिमा यात्रेत पालकमंत्री नितेश राणे यांचे श्री दीर्बादेवी-रामेश्वराचे दर्शन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड-जामसंडे गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री दीर्बादेवी-रामेश्वर देवस्थानचा त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त सुरू असलेल्या यात्रा उत्सवात महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी श्री दीर्बादेवी व रामेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने ना. नितेश राणे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाळीदार दीपक घाडी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ना. राणे यांच्यासमवेत माजी आमदार अजित गोगटे, मंडल तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, संदीप साटम, देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, गटनेते शरद ठुकरुल, वैभव कळंगुटकर सर्व नगरसेवक, योगेश चांदोसकर, दयानंद पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg