loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय युवा स्वयंरोजगार विकास संस्थेकडून नवलाई रामेश्वर पाणी वापर संस्थेची क्षेत्रीय पाहणी

तळवडे-पाचल (सुरेश गुडेकर): महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार पाणी वापर संस्था सक्षमीकरण व बळकटीकरण अभियानांतर्गत नवलाई रामेश्वर पाणी वापर संस्था, तळवडे या संस्थेची निवड प्रात्यक्षिक प्रकल्प म्हणून करण्यात आली आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय युवा स्वयंरोजगार विकास संस्था, खेडशी-रत्नागिरी यांच्यामार्फत संस्थेच्या कामकाजाची प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करण्यात आली. यावेळी गावात वाडीनिहाय बैठका घेऊन अर्जुना प्रकल्पांतर्गत पाणी वितरणातील अडचणी, तफावत, सद्यस्थितीतील पीक पाणी व्यवस्थापन याबाबत गटचर्चा व गृहभेटीच्या माध्यमातून माहिती घेण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संस्थेच्या प्रमुख निलम पालव, प्रोजेक्ट मॅनेजर आदित्य कदम, अभियंता विश्वनाथ मांडवकर, कृषी तज्ज्ञ रुची भुवड, तसेच पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष संदीप बारसकर व संस्थेचे सभासद, शेतकरी उपस्थित होते. दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत तळवडे येथील शासन निर्मित सिंचन क्षेत्र, पाण्याच्या पाळ्या व पीक पाणी व्यवस्थापनाची माहिती घेण्यात आली. क्षेत्रीय पाहणी दरम्यान सर्व सभासद, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उत्तम सहकार्य केल्याबद्दल संस्थेच्या प्रमुख निलम पालव यांनी समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg