संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - गावाच्या शाश्वत विकासासाठी आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने कुंभारखाणी खुर्द येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सामूहिक बंधारा उभारण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात गावातील महिला, पुरुष आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदान केले. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते स्थानिक परिसरात साठवून ठेवता यावे, तसेच जमिनीत पाण्याचा मुरवटा वाढून भूजल पातळीत सुधारणा व्हावी, या उद्देशाने ओढ्यावर बंधारा बांधण्यात आला. प्लास्टिक शीटचा वापर करून तसेच माती भरलेल्या पोत्यांच्या साहाय्याने पाण्याचा प्रवाह अडविण्याची व्यवस्था करण्यात आली.
विशेष म्हणजे, या कामामध्ये ग्रामस्थांनी केवळ उपस्थिती नोंदवली नाही, तर प्रत्यक्ष पाण्यात उतरून बंधारा उभारण्याच्या कामात हातभार लावला. महिला वर्गानेही या उपक्रमात सहभाग घेतल्याने गावातील एकजुटीचे आणि सामूहिक कार्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. आज अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत जलसंधारणाचे छोटे-मोठे उपक्रम भविष्या साठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. कुंभारखाणी खुर्द ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबविण्यात आलेला हा उपक्रम गावाच्या जलसंधारणाच्या दृष्टीने निश्चितच सकारात्मक पाऊल आहे.
गावाचा विकास हा केवळ एका व्यक्तीचा किंवा ग्रामपंचायतीचा नसून तो संपूर्ण गावाचा सामूहिक संकल्प असतो. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे केलेल्या या प्रयत्नातून गावाच्या विकासासाठी लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये जलसंधारणाविषयी जागरूकता निर्माण होऊन भविष्यातही अशाच प्रकारचे लोकसहभागातून विकासाचे उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.