loader
Breaking News
Breaking News
Foto

धामणी येथे स्थानिक काकवळवाडी शेती सहकारी पाणी पुरवठा योजना व ब्राह्मणवाडी ग्रामस्थांनी एकाच दिवशी बांधले ३ बंधारे

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - चालू वर्षी जून महिन्यात उशिरा कोकणात दाखल झालेला मान्सून कालावधी पूर्ण होण्याआधी म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच कोकणातून जवळपास मुक्काम हलवला. त्यानंतर सतत पडणार्या कडक उन्हामुळे नदी, नाले, विहीरी, पाणवठे आदी ठिकाणची पाणी पातळी खूपच खालावली. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात येणारी पाण्यासाठी वणवण येत्या नोव्हेंबरपासूनच करावी लागेल, अशा काळजीयुक्त विचाराने संगमेश्वर‌ तालुक्यातील धामणी येथील काकवळवाडी व ब्राह्मणवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकाच दिवशी तीन ठिकाणी ३ बंधारे बांधले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे सध्याच्या पाणी साठ्यात वाढ होणार असून या दोन्ही वाडीतील लोकांना पिण्याच्या पाण्याचा फायदा होणार आहे. शेती सहकारी काकवळवाडी व परिसर आणि घरडा फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरू केलेली पाणी योजना आज सुमारे तीस वर्षांपूर्वीची या वाडीने सुरु केलेली पाणी योजना येथील ग्रामस्थांच्या सहकार्यांने उत्तमरित्या चालू आहे. या पाणी योजनेला आज बांधलेल्या तीन बंधार्‍यांमुळे नक्कीच फायदा होणार आहे.

टाईम्स स्पेशल

मंगेश बाणे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली नंदकुमार गुरव, उमेश लिंगायत, प्रकाश काकवळ, गणेश देवरूखकर, रमेश मेस्त्री, भारत मेस्त्री, भिकाजी मेस्त्री, सिताराम करंडे, महादेव काकवळ, यशवंत काकवळ, नारायण काकवळ, मिलिंद सुर्वे इत्यादी ग्रामस्थांनी अमूल्य वेळ व सहभाग देऊन बंधारा उभारणीस योगदान दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg