loader
Breaking News
Breaking News
Foto

गिर्ये गावात कच्च्या बंधाऱ्यांच्या बांधकामाचा शुभारंभ, लोकसहभागातून आणखी १५ बंधारे बांधण्याचे नियोजन

देवगड (प्रतिनिधी) - भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने गिर्ये गावात कच्चे बंधारे बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.जिल्हा परिषद गटनेते संजय बोंबडी, पंचायत समिती गटनेत्या संजना आळवे, गिर्ये सरपंच लता गिरकर, भाजप युवा मोर्चा पडेल अध्यक्ष आशिष जाधव यांच्या माध्यमातून गिर्ये कोठारवाडी वहाळ तसेच गिर्ये करंजईवाडी वहाळ येथे कच्चे बंधारे बांधण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत अधिकारी आदित्य कदम, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोकसहभागाच्या माध्यमातून गिर्ये परिसरात आणखी १५ कच्चे बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच लवकरच जलतारा कामांनाही सुरुवात करण्यात येणार आहे. भविष्यातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता पावसाचे पाणी शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात अडवून ते जमिनीत जिरविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, पंचायत समिती देवगडचे गटविकास अधिकारी निलेश जगताप तसेच विस्तार अधिकारी ग्रामपंचायत दिपक तेंडुलकर यांनी या बंधाऱ्यांना भेट देऊन पाहणी केली. पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशाने लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरातील भूजलपातळी वाढण्यास तसेच भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg