loader
Breaking News
Breaking News
Foto

आसुद सोसायटीच्या महालोन मेळाव्यास ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद; सोसायटीने आयोजन केलेल्या सलग तिसऱ्या वर्षीचाही महालोन मेळावा यशस्वी!

दापोली (प्रतिनिधी) : आसुद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने आयोजित केलेल्या 'महालोन मेळाव्यास' ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सोसायटीने सलग तिसऱ्या वर्षीही हा मेळावा यशस्वी करून दाखवला आहे. सहकारी क्षेत्रातील या उल्लेखनीय उपक्रमामुळे परिसरातील शेतकरी, व्यावसायिक आणि गरजू ग्राहकांना एकाच छताखाली विविध कर्ज योजनांचा लाभ घेता आला. दापोली तालुक्यातील आसुद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ही आपल्या विविध उपक्रमांनी शेतकरी सभासदांचे हीत साधणारी कोकणातील एकमेव अशी सोसायटी आहे. या सोसायटीने राज्यस्तरीय सहकार क्षेत्रातील विविध प्रकारचे मानाचे व प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार मिळविलेले आहेत. अशा या सोसायटीने सातत्य राखत सलग तिसऱ्या वर्षी या भव्य कर्ज मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले. अशा या मेळाव्यात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कर्ज मंजुरीची सुलभ प्रक्रिया आणि पारदर्शकतेमुळे ग्राहकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. शेती कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, आणि इतर व्यावसायिक कर्जांबाबत ग्राहकांना थेट मार्गदर्शन आणि मंजुरीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली. आसुद सोसायटीने राबवलेला हा उपक्रम ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून ग्राहकांना सक्षम करण्याचा एक उत्तम आदर्श ठरला आहे. या मेळाव्याच्या यशामुळे सोसायटीच्या संचालक मंडळाचे आणि कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दापोली तालुक्यातील आसुद येथील आसुद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ही आपल्या सभासदांना आर्थिक पतपुरवठा करून आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचे महत्वाचे काम कायमच करत आली आहे. त्यामुळे सहकारातील विविध प्रकारचे मानाचे पुरस्कार या सोसायटीने केवळ जिल्हाच्या मर्यादेत नाही तर कोकण विभागासह अगदी राज्यस्तरावर देखील पुरस्कार प्राप्त करून आपल्या नाव लौकिकाचा ठसा सर्वदूर उमटवला आहे. अशा या आसुद सोसायटीने सलग तिसऱ्या वर्षी स्टॅडर्ड कंपनीच्या ग्राहकोपयोगी टिकाऊ आणि किफायतशीर दरातील किंमतीच्या दुचाकी, चारचाकी तसेच वाॅशिंग मशीन, टि.व्ही. घरघंटी, लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल आदी ईलेक्ट्रॉनिक वस्तूंसह सोफाशेट, कपाटे, कृषी विषयक औजारे आदी वस्तू विक्रिस ठेवलेल्या होत्या.

टाईम्स स्पेशल

एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या या वस्तू कोटेशनच्या शंभर टक्के लोन देऊन कमी व्याजदरात सुलभ हप्त्यात उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तूंचा महालोन मेळावा आयोजन करणारी आसुद ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.आसुद ही संपूर्ण कोकणातील एकमेव कृषी क्षेत्रातील सोसायटी ठरली आहे. अशा या आसुद सोसायटीच्या महालोन मेळाव्यास रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुधीर कालेकर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. जयवंतशेठ जालगावकर, निवृत्त सर व्यवस्थापक सुनील गुरव, सहायक सरव्यवस्थापक मोहिते, संस्थेचे चेअरमन मंगेश बांद्रे, व्हाईस चेअरमन वैभव वराडकर, सचिव चंद्रशेखर देपोलकर, चारुता कामतेकर सर्व संचालक, संस्थेचे माजी संचालक, आसुद, आंबवली खुर्द, सालदुरे येथील स्थानिक ग्रामस्थ त्याचप्रमाणे सभासद उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg