loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळेकरांना मिळणार अभंगाची भक्तिरसाची मेजवानी, खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती

म्हसळा (वार्ताहर) - म्हसळेकरांना भक्तिरसात चिंब भिजविणाऱ्या ‘अभंग रिपोस्ट’ या विशेष कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि दाजी विचारे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा कन्या शाळेच्या मैदानावर या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगणाऱ्या या कार्यक्रमात अभंग, भक्तिगीते आणि संगीताची सुरेल मैफल रंगणार असून, म्हसळेकरांना भक्ती-संगीताचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाला भक्ती आणि कलाविष्काराची सुंदर जोड मिळणार आहे. “म्हसळेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभंग रिपोस्ट कार्यक्रमाचा भक्तिरसपूर्ण आस्वाद घ्यावा,” असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg