loader
Breaking News
Breaking News
Foto

तु. बा. कदम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अनुग्रह विशेष शाळेला सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांकडून विशेष मुलांसोबत संवाद आणि खाऊ वाटप

भरणे (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या अंगी सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने, भरणे येथील तुकाराम बाबूराव कदम महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी वेरळ येथील 'अनुग्रह विशेष शाळेला' (दिव्यांग व विशेष मुलांची शाळा) शैक्षणिक भेट देण्यात आली. या भेटीत समाजशास्त्र विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक व सामाजिक ज्ञानाला चालना देण्यासाठी दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून चालू शैक्षणिक वर्षामध्ये अनुग्रह विशेष शाळेला भेट देण्याचे नियोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभूती (Field Visit) मिळावी आणि समाजातील विशेष घटकांच्या जीवनशैलीचा जवळून अभ्यास करता यावा, हा या शैक्षणिक भेटीमागील मुख्य हेतू होता. या भेटीदरम्यान महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने निधी गोळा करून विशेष शाळेतील मुलांसाठी खाऊ वाटपाचे आयोजन केले होते. केवळ खाऊ वाटप न करता, या विद्यार्थ्यांनी विशेष मुलांसोबत वेळ घालवला. मुलांसोबत बडबड गीते गाऊन आणि विविध खेळ खेळून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी अनुग्रह विशेष शाळेच्या मुख्याध्यापिका हेली जॉर्ज, तसेच जाधव, संदीप कांबळे आणि कविता जगताप उपस्थित होते. या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी खेडेकर यांनी या शैक्षणिक भेटीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. समाजातील विशेष घटकांप्रती संवेदनशीलता दाखवत विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg