संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असताना बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. ऐन सणासुदीच्या आणि आठवडा बाजाराच्या दिवशीच एटीएम सेवा बंद असल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. दिवाळीच्या खरेदीसाठी संगमेश्वर आठवडा बाजारात तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक आले होते. तसेच दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मुंबई, ठाणे आणि अन्य शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी दाखल झाले आहेत.
सणासाठी कपडे, किराणा, मिठाई तसेच अन्य आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत आले होते. मात्र, पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रांवर गेलेल्या ग्राहकांना दोन्ही बँकांची एटीएम सेवा बंद असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अनेक ग्राहकांच्या बँक खात्यात पैसे असूनही एटीएममधून रोकड मिळत नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली. ऐन दिवाळीत रोख रकमेची गरज असताना एटीएम बंद असल्याने काही ग्राहकांना खरेदी अर्धवट सोडावी लागली, तर काहींना इतर पर्याय शोधण्यासाठी बाजारपेठेत फिरावे लागले.
सणासुदीच्या काळात बँकांमध्ये सुट्ट्या असल्याने एटीएमवरच नागरिकांची मोठी भिस्त असते. अशा परिस्थितीत एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध ठेवणे आणि सेवा सुरळीत सुरू ठेवणे आवश्यक आहे. मात्र, संगमेश्वरमधील प्रमुख बँकांची एटीएम सेवा बंद असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणात तरी बँकांनी एटीएम सेवा सुरळीत ठेवून ग्राहकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.