loader
Breaking News
Breaking News
Foto

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुहागरमध्ये श्री देव व्याडेश्वर व श्रीदुर्गादेवीचे घेतले दर्शन

वरवेली (गणेश किर्वे) - राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुहागर दौऱ्यादरम्यान गुहागर शहरातील श्री देव व्याडेश्वर आणि गुहागर वरचा येथील श्री दुर्गादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. हा त्यांचा खासगी दौरा होता. श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने अध्यक्ष शार्दुल भावे व कार्यवाह अमरदीप परचुरे व अन्य देवस्थान पदाधिकारी यांच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा त्यांच्या पत्नीसह गौरव करण्यात आला. तसेच श्री दुर्गादेवी देवस्थानच्या वतीने अध्यक्ष किरण खरे यांच्या हस्ते मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिपळूण येथील करंजेश्वरी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ना. चंद्रकांत पाटील वाहनाने गुहागर येथे दाखल झाले. येथे त्यांनी प्रथम श्री देव व्याडेश्वराचे, त्यानंतर श्री दुर्गादेवीचे दर्शन घेतले. दर्शन व भोजन झाल्यानंतर वाहनाने चिपळूण रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले. ना. पाटील हे गेल्या काही वर्षांपासून आपल्या पत्नीसह गुहागर येथे येऊन देवदर्शन घेत असतात. यावेळी दोन्ही देवस्थानांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येतो. याही वर्षी आवर्जून त्यांनी या देवस्थानाला भेट दिली. मंदिर भेटीदरम्यान त्यांनी गुहागर शहरातील विविध समस्यांबाबतही उपस्थितांशी चर्चा देखील केली.

टाईम्स स्पेशल

यावेळी त्यांच्या समवेत पत्नी अंजली पाटील, सचिन पटवर्धन, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, व्याडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शार्दूल भावे, विश्वस्त अमरदीप परचुरे, सचिन मुसळे, शाम आठवले, दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, नगराध्यक्षा नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, तहसीलदार परीक्षित पाटील, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, नगरसेवक उमेश भोसले, संतोष सांगळे, सुजित साटले, नगरसेविका भावे, सोमण, सचिन ओक, मंदार पालशेतकर, नरेश पवार, संगम मोरे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg