loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीकाळकाई मंदिर खेड येथे पंचम सुरांनी रंगली दिवाळी पहाट

खेड - श्रीकाळकाई मंदिर भरणे खेड येथे भक्तीगीत आणि भावगीतांनी सुरेल पहाट सजली. श्रीकाळकाई देवस्थान भरणे आयोजित दिवाळी पहाट हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. गणेश आंबुर्ले प्रस्तुत... पंचम सूर मधुर या संगीत समुहाने भक्तीगीत आणि भावगीते सुरेल आणि मंत्रमुग्ध करणारी सादर केली. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. या कार्यक्रमात कल्पेश शिंदे, सचिन पवार आणि नमिता माळी व पंचम सुर मधुरचे सर्वेसर्वा विनय माळी यांनी सुरेल गाणी सादर केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच या कार्यक्रमाचे सुयोग्य सुत्रसंचलन अमृता काणे यांनी केले. विशेष कौशल्य म्हणून अनंत शिंदे यांनी डोक्यावर कॅसीओ वाजवून प्रेक्षकांची दाद मिळवली. दिवाळी पहाट या कार्यक्रमास लक्ष्मी मसालेचे विलास बुटाला यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याच प्रमाणे या कार्यक्रमाचा शुभारंभ विश्वस्त महेश जगदाळे अध्यक्ष, सतिश(बाबा) पाटणे खजीनदार आणि इतर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg