loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर आगारासाठी नवीन चार जिजाऊ बस दाखल, पालकमंत्री उदय सामंत यांचे मानले आभार

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर आगाराच्या ताफ्यात नवीन चार जिजाऊ बस दाखल झाल्या आहेत. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे आणि प्रवासी सेवेत अधिक सुधारणा करण्यासाठी या नवीन बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बस दाखल झाल्याने गुहागर आगाराची सेवा क्षमता वाढणार आहे. विशेषतः महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी जिजाऊ बस ही महत्त्वाची सेवा आहे. या चार नवीन बस सुरू झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना, विशेषतः महिला, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर तालुका शिवसेना तसेच गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, सर्व पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर या सर्वांच्या मागणीवरून चार जिजाऊ बस गुहागर आगारामध्ये दाखल झाल्या आहेत. गुहागर आगारासाठी या बस उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री उदयजी सामंत यांचे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या बस मिळाल्या असून आगाराच्या वतीने आणि प्रवाशांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg