loader
Breaking News
Breaking News
Foto

झिपलाईनवर तरुण जोडपे अडकले; समुद्राच्या मध्यभागी हवेत लटकले

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध आरेवारे समुद्रकिनारी साहसी झिपलाईनचा अनुभव घेत असताना एका तरुण जोडप्यावर जीवघेणा प्रसंग ओढवला. समुद्राच्या दिशेने झिपलाईनवरून प्रवास करत असताना अचानक तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याने दोघेही समुद्राच्या मध्यभागी हवेतच अडकले. खाली अथांग समुद्र आणि वर हवेत लटकलेले जोडपे, अशा थरारक परिस्थितीमुळे किनाऱ्यावर उपस्थित पर्यटकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या रस्सीच्या साहाय्याने दोघांची सुखरूप सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरेवारे समुद्रकिनाऱ्यालगतच्या उंच कड्यावरून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने झिपलाईनची साहसी सुविधा सुरू करण्यात आली आहे. समुद्राच्या वरून हवेत झेपावत रोमांचक अनुभव घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. गुरुवारी संध्याकाळी एका तरुण जोडप्याने या झिपलाईनचा आनंद घेण्यास सुरुवात केली. मात्र, समुद्राच्या मध्यभागी पोहोचताच झिपलाईन अचानक थांबल्याने दोघेही हवेत लटकलेल्या अवस्थेत अडकले. हा प्रकार लक्षात येताच किनाऱ्यावर उपस्थित पर्यटकांमध्ये एकच खळबळ उडाली. संबंधित कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. दुसऱ्या मजबूत रस्सीची व्यवस्था करून तिच्या सहाय्याने अडकलेल्या जोडप्याला हळूहळू किनाऱ्याच्या दिशेने खेचण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर दोघांनाही सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात यश आले.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, झिपलाईन नेमकी कोणत्या कारणामुळे बंद पडली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. तांत्रिक बिघाड की अन्य काही कारण, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे आरेवारे समुद्रकिनाऱ्यावरील साहसी पर्यटन सुविधांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी झिपलाईनची नियमित तांत्रिक तपासणी, सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन बचाव व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg