loader
Breaking News
Breaking News
Foto

भांबेड विद्यालयाच्या विद्यार्थ्याचे लांजा तालुका क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था, भांबेड संचलित प्रतापराव माने विद्यालय आणि सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय, भांबेड येथील विद्यार्थ्यांनी लांजा तालुका शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२५-२६ मध्ये नेत्रदीपक कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. वैयक्तिक स्पर्धांतील यशासोबतच सांघिक खेळातील कामगिरीमुळे विद्यालयाच्या खेळाडूंची एकजूट, मेहनत आणि जिद्द अधोरेखित झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची नियमित मेहनत, जिद्द, शिस्त आणि क्रीडा शिक्षक पी. एन. कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या या दमदार कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक पी. एन. कांबळे यांचे भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश साळुंके, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg