loader
Breaking News
Breaking News
Foto

मोबाईलवर बोलत एसटी चालवणाऱ्या चालकाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ; चिपळूण–बेळगाव बसमधील प्रकार

खेड (प्रतिनिधी) : चिपळूण–बेळगाव मार्गावर धावणाऱ्या एसटी बस क्रमांक MH 14 LX 4215 च्या चालकाकडून वाहन चालविताना वारंवार मोबाईल फोनचा वापर करण्यात आल्याचा गंभीर प्रकार १ ऑक्टोबर २०२६ रोजी समोर आला आहे. चालक मोबाईलवर बोलत बस चालवत असल्याने बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित बस चिपळूण बसस्थानकातून निघाल्यानंतर चालकाने वाहन चालविताना मोबाईल फोनवर कॉल अटेंड केल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोयना–पाटण दरम्यानच्या प्रवासात चालकाने तब्बल दोन वेळा मोबाईलवर कॉल रिसीव्ह करून बस चालविल्याचे सांगण्यात येत आहे. वाहन चालविताना चालकाचे लक्ष मोबाईलकडे जाणे हे प्रवाशांसह रस्त्यावरील इतर वाहनचालकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करणारे ठरू शकते. एसटी बसमधून दररोज मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. त्यामुळे बसचालकाने वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे ही बाब गंभीर मानली जात आहे. चालकाच्या एका चुकीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टाईम्स स्पेशल

या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या या प्रकाराची चौकशी करून, आरोप सत्य आढळल्यास संबंधित चालकावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या घटनेची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg