loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत लोकसहभागातून मातीचे बांध; जलसंधारणासाठी नगरपालिकेचा पुढाकार

​सावंतवाडी, (प्रतिनिधी) - दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि जलसंधारण व पाणी बचतीची कामे प्रभावीपणे राबवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशांनुसार सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा श्रध्दा सावंत भोसले यांच्या पुढाकारातून आणि लोकसहभागातून शहरात विविध ठिकाणी मातीचे बांध घालण्याचा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या उपक्रमांतर्गत शहरातील सालईवाडा येथील विनोद सावंत यांच्या घराजवळील नाल्यामध्ये आणि माठेवाडा येथील अवधूत नार्वेकर यांच्या घराजवळील नाल्यामध्ये लोकसहभागातून मातीचे बांध घालण्यात आले. ​या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमात लोकप्रतिनिधी, विविध संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला नगरपालिकेचे सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक, तसेच युवराज लखमराजे सावंत-भोसले उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

​तसेच एस. पी. के. कॉलेजचे विद्यार्थी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, आरोग्य कृती समिती आणि सावंतवाडी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन श्रमदान केले. या उपक्रमामुळे शहरातील जलसंधारणाच्या कामांना मोठी गती मिळाली आहे. येत्या काळात नगरपालिकेच्या वतीने शहरातील आणखी काही ठिकाणी मातीचे बांध घातले जाणार असून, त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती दिपाली भालेकर, प्रतिक बांदेकर, निलम नाईक, आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg