loader
Breaking News
Breaking News
Foto

जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी मंगेश रामदास कोंडविलकर यांची निवड

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी मंगेश रामदास कोंडविलकर यांची निवड झाली आहे. ग्रामपंचायतच्या उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते. बुधवारी जानवळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच निवडणूक पार पडली. उपसरपंच पदासाठी मंगेश रामदास कोंडविलकर व प्रसन्न प्रकाश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपसरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मंगेश कोंडविलकर यांना ७ मते तर प्रसन्न प्रकाश पाटील यांना ३ मते प्राप्त झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी गोरक्ष सोनावणे यांनी मंगेश कोंडविलकर हे विजयी झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे, ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वैभवी विनोद जानवळकर, ग्रामपंचायत सदस्य मूबीन ठाकूर, अनिल कोलंबेकर, सेजल धामणस्कर, विजया शितप, अनिता जाधव, विभावरी लांजेकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

उपसरपंच निवडणुकीमध्ये विजय झालेले मंगेश रामदास कोंडविलकर यांचे गुहागर पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, कोतलुक ग्रामपंचायत उपसरपंच सचिन ओक, साईनाथ कळझुणकर, सचिन कोंडविलकर, प्रशांत शिरगावकर, संदीप कोंडविलकर, महेश जाधव, विनोद जानवळकर, तेजस कोंडविलकर, महेश तांबे यांनी शुभेच्छा दिल्या. जानवळे गावातून अनेक नागरिकांनी त्यांना भेटून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg