रत्नागिरी, - रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक मच्छीमारांकडून रायगड जिल्ह्यातील काही मासेमारी नौका एलईडी दिव्यांचा वापर करून अवैध मासेमारी करीत असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाने ऑपरेशन निशाचर ही विशेष गुप्त मोहीम आखली. प्रतिकूल हवामान, समुद्रातील जोरदार वारे, उंच भरतीच्या लाटा आणि नियमित गस्ती नौका कार्यान्वित नसण्यासारखी आव्हाने असतानाही विभागाच्या पथकाने मध्यरात्री धाडसी कारवाई करत दापोली तालुक्यातील अंजर्ले किनारपट्टीसमोर रायगड जिल्ह्यातील ‘एकवीरा दर्शन’ या एलईडी मासेमारी करणार्या नौकेला पकडले. रत्नागिरी विभागाची नियमित गस्ती नौका काही दिवसांपासून कार्यान्वित नसल्यामुळे अवैध मासेमारीविरोधातील कारवाईसमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक मच्छीमारांच्या तक्रारींची दखल घेत विभागाने पर्यायी गस्ती नौका मुंबई येथून उपलब्ध करून थेट दापोली किनारपट्टी परिसरात कारवाई करण्याची रणनीती आखली. समुद्रातील जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे परिस्थिती आव्हानात्मक असतानाही पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने मध्यरात्री मोहीम राबविली. या विशेष मोहिमेदरम्यान अंजर्ले किनारपट्टीसमोर एलईडी दिव्यांच्या साहाय्याने मासेमारी करणार्या ‘एकवीरा दर्शन’ नौकेवर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान रायगड जिल्ह्यातील आणखी दोन एलईडी मासेमारी नौका परिसरात उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. समुद्रातील जोरदार वारे आणि प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेत या दोन्ही नौका पथकाच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाल्या. तथापि, गस्ती पथकाने तत्परतेने केलेल्या कारवाईत या नौकांवरील अवैध एलईडी दिव्यांचे नुकसान करण्यात यश मिळविले. या कारवाईमुळे अवैध एलईडी मासेमारीविरोधात विभागाने प्रतिकूल समुद्री परिस्थितीतही दाखविलेली सज्जता आणि तत्परता अधोरेखित झाली आहे. या कारवाईत परवाना अधिकारी, रत्नागिरी चिन्मय जोशी, परवाना अधिकारी, गुहागर स्वप्नील चव्हाण, परवाना अधिकारी, साखरी नाटे पार्थ तावडे, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक पुरुषोत्तम घवाळी आणि सागरी सुरक्षा रक्षक सचिन सुद यांनी सहभाग घेतला. आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य भानुदास पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरीक्त आयुक्त मत्स्यव्यवसाय महेश देवरे, सहआयुक्त मत्स्यव्यवसाय नागनाथ भादुले आणि सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी जीवन सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय विभागात उपलब्ध मनुष्यबळ अत्यंत मर्यादित असून, अनेक परवाना अधिकार्यांकडे त्यांच्या नियमित कार्यक्षेत्राव्यतिरिक्त अतिरिक्त कार्यक्षेत्रांचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. प्रशासकीय कामकाजाची अतिरिक्त जबाबदारी आणि मर्यादित मनुष्यबळ अशा दुहेरी आव्हानांना सामोरे जात असतानाही परवाना अधिकारी प्रत्यक्ष सागरी गस्त व धडक कारवाई मोहिमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. एलईडी दिव्यांच्या साहाय्याने होणार्या अवैध मासेमारीमुळे पारंपरिक व कायदेशीर मासेमारी करणार्या स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन सागरी पर्यावरणाचे संरक्षण, मत्स्यसंपदेचे संवर्धन आणि कायदेशीर मासेमारी करणार्या मच्छीमारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग कटिबद्ध आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.