loader
Breaking News
Breaking News
Foto

रेल्वेची धडक… तरुण गंभीर जखमी… मात्र मंगला एक्सप्रेसच्या चालकाची आणि पोलिसांची सतर्कता ठरली जीवनदायी!

संगमेश्वर (सत्यवान विचारे). : संगमेश्वर रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे रूळ ओलांडताना झारखंडमधील सुमारे ३० वर्षीय सुरजन डंगडेंग हा तरुण रेल्वेच्या धडकेत गंभीर जखमी झाला. रुळाजवळ पडलेल्या या तरुणाला मुंबईकडे जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसच्या चालकाने पाहताच रेल्वे स्थानकाला माहिती दिली.त्यानंतर रेल्वे पोलिसांनी आणि होमगार्डनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. चालकाची सतर्कता आणि पोलिसांची तत्परता यामुळे जखमी तरुणाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg