रत्नागिरी (जमीर खलफे) - कोकणच्या ऐतिहासिक सागरी वारशाची उज्ज्वल परंपरा जपत, युवाशक्ती आणि लष्करी शिस्तीचे नयनरम्य दर्शन घडवणारी राष्ट्रीय स्तरावरील 'मेन्यू २७' खुली समुद्र नौकानयन मोहीम गुरूुवारपासून अधिकृतपणे सुरू झाली. २ महाराष्ट्र नवल युनिट एनसीसी, रत्नागिरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या २५० किलोमीटरच्या ध्येयधुंद मोहिमेचा भव्य शुभारंभ रत्नागिरीतील अल्ट्राटेक जेटी येथून अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कोल्हापूर एनसीसी ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांच्या हस्ते आणि २ महाराष्ट्र नवल युनिटचे कमांडिंग ऑफिसर कमांडर रामंजुल दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेतील नौकांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणी भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल (कोस्ट गार्ड), रत्नागिरी जिल्हा प्रशासन, प्रादेशिक बंदर कार्यालय (पोर्ट ऑफिस) तसेच कस्टम्स विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेचे सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे यामध्ये सहभागी झालेले ६० उत्कृष्ट एनसीसी नौदल कॅडेट्स. संपूर्ण महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या या कॅडेट्समध्ये ३५ मुली आणि २५ मुलांचा समावेश आहे.
या मोहिमेला निघण्यापूर्वी ६ ते १५ ऑक्टोबर दरम्यान 'CATC-327' या १० दिवसांच्या खडतर पूर्व-तयारी शिबिरात सर्व कॅडेट्सना सागरी नेव्हिगेशन, बोट पुलिंग, रिगिंग तसेच आपत्कालीन परिस्थितीतील बचावाचे कडक व तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. कॅडेट्सचा हा प्रवास २७ फूट लांबीच्या ३ अत्यंत मजबूत अशा 'डीके व्हेलर' नौकांद्वारे पार पडणार आहे. रत्नागिरी येथून सुटलेला हा ताफा पलशेतपर्यंत जाऊन पुन्हा रत्नागिरीला परतणार आहे. या संपूर्ण प्रवासादरम्यान तिवरी, जयगड, बोरिया आणि पलशेत या ठिकाणी बेड्यांचे मुख्य थांबे निश्चित करण्यात आले आहेत. ही मोहीम केवळ एका साहसी प्रवासापुरती मर्यादित नसून "कोकण ज्ञान तरंग" या संकल्पनेवर आधारित आहे. “ज्ञानाच्या लाटा, प्रगतीच्या वाटा” हे या मोहिमेचे मुख्य ध्येयवाक्य असून, या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा आरमाराच्या अथांग आणि ऐतिहासिक सागरी परंपरेला भावपूर्ण उजाळा देण्यात येत आहे. यासोबतच "ज्ञान आणि प्रगतीची वाट: आदर्श कोकणाच्या दिशेने नौकानयन" या व्यापक सामाजिक उपक्रमांतर्गत हे कॅडेट्स ठिकठिकाणी थांबून किनारपट्टीवरील गावांमध्ये सामाजिक प्रबोधन करणार आहेत. यात तटीय सुरक्षा सागरी प्रदूषण आणि समुद्र स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी रॅली, विविध पथनाट्ये आणि प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
एनसीसीच्या 'मोस्ट एंटरप्रायझिंग नेवल युनिट' या पंतप्रधान रोलिंग ट्रॉफीच्या अत्यंत मानाच्या राष्ट्रीय स्पर्धेचा ही मोहीम एक मुख्य भाग आहे. या यशस्वी आयोजनामुळे महाराष्ट्र एनसीसी डायरेक्टरेटला राष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वपूर्ण गुण मिळणार आहेत. अथांग समुद्रातील हा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी अत्यंत चोख आणि अभेद्य सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. कॅडेट्सच्या सुरक्षेसाठी ३ विशेष एस्कॉर्ट व अत्याधुनिक बचाव नौका संपूर्ण ताफ्यासोबत तैनात आहेत. वेस्टर्न नवल COMMAND, कोस्ट गार्ड स्टेशन रत्नागिरी, एमआरसीसी मुंबई, प्रादेशिक बंदर कार्यालय, कस्टम्स विभाग आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचे मोलाचे सहकार्य या मोहिमेस लाभले आहे. "ही मोहीम केवळ एका स्पर्धेपुरती किंवा प्रवासापुरती मर्यादित नसून तरुणांमधील नेतृत्वगुण, धाडस, साहस आणि लष्करी शिस्त घडवणारी आहे. खुल्या समुद्रातील निसर्गाची आव्हाने कॅडेट्सना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक कणखर बनवतील, तसेच त्यांना कोकणाच्या समृद्ध सागरी इतिहासाची प्रत्यक्ष जाणीव करून देतील असे मत ब्रिगेडियर आर. के. पैठणकर (ग्रुप कमांडर, कोल्हापूर एनसीसी ग्रुप) यांनी व्यक्त केलं.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.