loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभिजीत देवळेकर यांचा पुढाकार

मंडणगड (प्रतिनिधी) : अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना शेतीमध्ये स्वावलंबी बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांनी पुढाकार घेतला आहे. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवून पात्र शेतकऱ्यांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या महत्त्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच, वीज जोडणी, शेततळे अस्तरीकरण, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन संच अशा विविध कृषी सुविधांसाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्याबरोबरच शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ मंडणगड तालुक्यातील गोठे सिद्धार्थनगर येथे अभिजीत देवळेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्यांनी शेतकरी महिलांशी संवाद साधत योजनेची सविस्तर माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी केले. या मोहिमेच्या माध्यमातून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण आणि गुहागर या पाच तालुक्यांतील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकरी बांधवांपर्यंत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन योजनेची माहिती पोहोचविण्याचा संकल्प अभिजीत देवळेकर यांनी केला आहे. केवळ योजना सांगण्यापुरते मर्यादित न राहता पात्र शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुक्यातील पंचायत समितीच्या कृषी विभागात सादर करावीत. अधिक माहितीसाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाशी अथवा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. या जनजागृती उपक्रमावेळी गोठे सिद्धार्थनगर येथील अपर्णा जाधव, स्वप्नाली जाधव, सुवर्णा जाधव, देवेश जाधव आणि निलेश जाधव उपस्थित होते. शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेवटच्या घटकातील पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि शेतीमध्ये स्वावलंबी बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते आणि जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg