loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली शहरात ख्रिस्ती समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी व्हावी, ख्रिस्ती समाज बांधवांची नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडे मागणी

कणकवली (प्रतिनिधी) - कणकवली शहरात ख्रिस्ती समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी व्हावी यासाठी ख्रिस्ती समाज बांधवांनी कणकवली नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेत स्वतंत्र स्मशानभूमीच्या जागेसाठी निवेदन दिले. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक सत्यजित उर्फ बाळू पारकर याच्यासह ख्रिस्ती समाज बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनात कणकवली शहरात ख्रिस्ती समाजासाठी स्मशानभूमी नसल्यामुळे समाज बांधवाच्या अंत्यसंस्कारासाठी अडचणी येतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच अन्य ठिकाणी अंत्यसंस्काराला नेण्यासाठी खूप खूप लांबचा प्रवास करावा लागतो. यामुळे कणकवलीत स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत ख्रिस्ती बांधवाच्या निवेदनावर चर्चा करताना नगराध्यक्ष संदेश पारकर यानी आपण जागा सुचवा या जागेवर नगरपंचायतीच्या माध्यमातून स्मशानभूमी करून देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg