संगलट (प्रतिनिधी) - कोकणातील नद्या एकेकाळी या प्रदेशाच्या समृद्धीचा आणि जनजीवनाचा आधार होत्या. शेती, पिण्याचे पाणी, मासेमारी आणि निसर्गसंपन्नतेला बळ देणार्या याच नद्यांची अवस्था आता दिवसेंदिवस बिकट होत आहे. नागरीकरणाचा वाढता वेग, औद्योगिक वसाहतींमधून सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी, प्रक्रिया न करता नदीपात्रात मिसळणारे मैलापाणी आणि वाढत्या कचर्यामुळे कोकणातील अनेक नद्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील ५४ नदीप्रवाह प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. अंबा, पाताळगंगा, उल्हास आणि वालधुनी या नद्यांमधील प्रदूषणाच्या समस्या त्याची ठळक उदाहरणे असून, नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याबरोबरच पर्यावरण आणि जलस्रोतांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. प्रदूषणाची समस्या केवळ ठाणे आणि रायगड जिल्ह्यांपुरती मर्यादित नाही. रायगड जिल्ह्यातील महाड परिसरातून वाहणार्या सावित्री नदीच्या डादली पूल ते ओवळे गाव या पट्ट्याचा सीपीसीबीने प्रदूषित नदीप्रवाहांमध्ये समावेश केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पोफळी परिसरातील वशिष्ठी नदीचा प्रवाहही प्रदूषित म्हणून नोंदविण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा आणि तानसा नद्यांचे विशिष्ट प्रवाहही या यादीत आहेत.
या नद्यांच्या परिसरात वाढणारे नागरीकरण, सांडपाणी व्यवस्थापनातील त्रुटी आणि मानवी हस्तक्षेपामुळे नदीपात्रांवरील पर्यावरणीय दबाव वाढत आहे. त्यामुळे नदीच्या केवळ एका ठिकाणच्या पाण्याची तपासणी न करता संपूर्ण प्रवाहातील प्रदूषणाचे स्रोत शोधण्याची गरज अधोरेखित होत आहे. स्थानिक नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनले आहे. सुधागड, खालापूर, रोहा आणि पेण तालुक्यांतून वाहणारी अंबा नदी अनेक गावांची जीवनवाहिनी आहे. पाली शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीही या नदीचा आधार घेतला जातो. मात्र, नदीच्या पाण्यावर शेवाळासह हिरवट, पिवळसर आणि लालसर रासायनिक तवंग दिसू लागला आहे. पावसाळ्यानंतर बंधार्यांमध्ये अडवून ठेवलेल्या पाण्यात शेवाळाची वाढ होत असून, सांडपाणी आणि रासायनिक घटक साचल्याने पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. औद्योगिक रसायने, घरगुती सांडपाणी, कचरा आणि निर्माल्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत असून चवही बदलली आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिक आणि जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पाताळगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर आहे. खालापूर तालुक्यातील औद्योगिक पट्टचातून निर्माण होणारे सांडपाणी आणि रासायनिक घटक नदीत मिसळत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. खोपोली ते खारपाडा या नदीच्या पट्टधात प्रदूषणाची नोंद झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात पाताळगंगा नदीचा समावेश प्रदूषित नदीप्रवाहांमध्ये करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हास आणि वालधुनी नद्यांची स्थितीही चिंताजनक आहे. नागरी वस्तीतील सांडपाणी, औद्योगिक प्रदूषण आणि नदीपात्रातील अतिक्रमणांमुळे या नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. उल्हास नदी ही जिल्ह्यातील अनेक शहरांच्या पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत असतानाही तिच्या प्रवाहात प्रदूषित पाणी मिसळत आहे. अंबरनाथजवळील जांभूळ परिसरात मासे मृतावस्थेत आढळल्याच्या घटनांनी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उल्हास आणि वालधुनी नदीच्या प्रवाहाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून प्रदूषणाचे स्रोत शोधण्याचे निर्देश दिले आहेत. नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी समांतर बंदिस्त वाहिन्या उभारण्याची शक्यताही तपासण्यास सांगण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील काळू नदीच्या अटाळी परिसरातील पाण्याची स्थितीही गंभीर असून, सीपीसीबीच्या अहवालात या नदीच्या प्रवाहाचा प्राधान्य वर्ग एकमध्ये समावेश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, देशातील २७१ नद्यांवरील २९६ नदीप्रवाह प्रदूषित म्हणून नोंदविण्यात आले आहेत. २०१८ मध्ये ही संख्या ३५१ होती. देशपातळीवर प्रदूषित नदीप्रवाहांची संख्या कमी झाली असली तरी महाराष्ट्रातील ५४ नदीप्रवाहांचा या यादीत समावेश आहे. महाराष्ट्रातील २९ नदीप्रवाहांच्या पाण्याच्या गुणवत्तेत २०१८ च्या तुलनेत सुधारणा झाल्याचेही अहवालात नमूद आहे. या अहवालात जैवरासायनिक ऑक्सिजन मागणी अर्थात बीओडी हा प्रदूषण मोजण्याचा प्रमुख निकष वापरण्यात आला आहे.





.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)




















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.