loader
Breaking News
Breaking News
Foto

अलिबाग जिल्‍हा न्‍यायालयात अचानक झाडाझडती , तपासणीमध्‍ये काहीच संशयास्‍पद आढळून न आल्‍याने सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास सोडला.

अलिबाग,वार्ताहर: राज्‍यातील अनेक जिल्‍हा न्‍यायालयांमध्‍ये बॉम्‍ब ठेवल्‍याच्‍या धमकीचे मेल आल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर आज दुपारी अलिबाग येथील जिल्‍हा न्‍यायालयातदेखील झाडाझडती घेण्‍यात आली. परंतु तपासणीमध्‍ये काहीच संशयास्‍पद आढळून न आल्‍याने सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास सोडला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिकारी आणि आठ सदस्यांचे बॉम्बशोधक पथक तत्काळ न्यायालयात दाखल झाले. त्यानंतर श्वानपथकाच्या मदतीने न्यायालयातील प्रत्येक कक्षाची तपासणी करण्यात आली. तसेच वकील बार, विधी सेवा विभाग, न्यायालय परिसर आणि वाहनांचीही बारकाईने झडती घेण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संपूर्ण तपासणीदरम्यान कुठेही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे न्यायालय प्रशासनासह वकील आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठविला, त्यामागे कोणाचा हेतू आहे, हा खोडसाळपणा आहे की यामागे काही गंभीर कारण आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

न्यायालयांना अशा प्रकारचा धमकीचा ई-मेल पहिल्यांदाच प्राप्त झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तपासणीत काहीही आढळले नसले तरी खबरदारी म्हणून न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg