संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील नायरी मोहल्ला येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत दोन कौलारू घरांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत नियाज पाटणकर यांचे सुमारे २८ लाख रुपये, तर जाकीर पाटणकर यांचे सुमारे ५२ लाख रुपये असे एकूण तब्बल ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. फणसवणे मंडळ अधिकारी अनंत कदम यांनी ही माहिती दिली. सुदैवाने दोन्ही घरांमध्ये कोणीही वास्तव्यास नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मध्यरात्रीच्या सुमारास नायरी मोहल्ल्यातील पाटणकर यांच्या बंद असलेल्या घरांना अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण घराला आगीने वेढले. आगीची माहिती मिळताच देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी देवरुख नगरपंचायतीचे अग्निशमन कर्मचारी सचिन साळवी, राज कुंभार आणि आकाश करंडे यांनी तब्बल पाच तासांहून अधिक काळ अथक परिश्रम घेतले. पहाटे उशिरापर्यंत जागून या कर्मचार्यांनी आग विझविण्यासाठी पराकाष्ठा केली. आगीची तीव्रता आणि पाण्याची उपलब्धता यासारख्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली.
अग्निशमन वाहनातील पाणी अपुरे पडत असल्याने नदीतून पाणी आणण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, पंपामध्ये बिघाड झाल्याने या प्रयत्नांतही अडथळे निर्माण झाल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही अग्निशमन कर्मचार्यांनी हार न मानता आग नियंत्रणात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे विशेष कौतुक होत आहे. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश किणी, हेड कॉन्स्टेबल कोलगे, पोलीस कॉन्स्टेबल चौगुले आदी पोलीस कर्मचारी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. परिस्थिती हाताळताना पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि जबाबदारीची जाणीव निश्चितच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे, देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाने रात्रीच्या वेळी घटनास्थळी धाव घेत पाच तासांहून अधिक काळ केलेली धडपड आणि संगमेश्वर पोलिसांनी दाखविलेली तत्परता यामुळे या घटनेत बचावकार्याला मोठी मदत झाली. अशा संकटकाळात प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणार्या कर्मचार्यांच्या योगदानाची दखल घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
आगीच्या घटनेनंतर फणसवणे मंडळ अधिकारी अनंत कदम, तलाठी तसेच महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नियाज पाटणकर यांचे २८ लाख १२ हजार रुपये आणि जाकीर पाटणकर यांचे ५२ लाख ५० हजार रुपये असे एकूण ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी अनंत कदम यांनी दिली. मध्यरात्रीच्या या आगीत दोन कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी झाली. घर, संसारोपयोगी साहित्य आणि आयुष्यभराची जमापुंजी डोळ्यांदेखत जळून खाक झाली. या कुटुंबांना आता आर्थिक मदतीची गरज आहे. नायरीतील या आगीच्या घटनेत नुकसान मोठे असले, तरी अग्निशमन दलाचे कर्मचारी, संगमेश्वर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. विशेषतः देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन कर्मचार्यांनी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत केलेली पाच तासांची मेहनत दुर्लक्षित होता कामा नये. तसेच पोलीस निरीक्षक मितेश किणी, हेड कॉन्स्टेबल कोलगे, पोलीस कॉन्स्टेबल चौगुले आणि त्यांच्या सहकार्यांनी दाखविलेली तत्परता ही देखील प्रशंसनीय आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.