loader
Breaking News
Breaking News
Foto

पाचल विद्यालयाचे लिपिक महेंद्र धामापूरकर यांचे हृदयविकाराने निधन; परिसरात हळहळ

तुषार पाचलकर (राजापूर): राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथे लिपिक म्हणून सेवेत असलेले महेंद्र रमेश धामापूरकर (वय ४९) यांचे शुक्रवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. कुडाळ तालुक्यातील पडवे येथील रुग्णालयातून उपचारानंतर केळवली येथील निवासस्थानी आणत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मिक जाण्याने पाचल व केळवली पंचक्रोशीत तीव्र शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मूळचे केळवली येथील रहिवासी असलेले महेंद्र धामापूरकर यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९७७ रोजी झाला होता. सन २००८ पासून ते सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथे लिपिक म्हणून अविरत सेवा बजावत होते. मनमिळाऊ, शांत आणि कर्तव्यदक्ष स्वभाव असलेल्या धामापूरकर यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गात स्वतःचे आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या शासकीय सेवेची अजून सुमारे १० वर्षे शिल्लक होती.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांच्यावर अर्धांगवायूचे (पॅरालिसिस) उपचार सुरू होते. त्यातच शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी कुडाळ येथील पडवे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून घरी परतत असताना रस्त्यातच त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त होत असून पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, प्रशाला परिवार व ग्रामस्थांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg