रत्नागिरी, : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणि गावागावांत सक्षम आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा लोकनेते शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद येथे मोठ्या उत्साहात पार पडली. आरोग्य ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून लोकसहभागातूनच गाव निरोगी व संपन्न होऊ शकते, असा सूर या वेळी मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
आरोग्य ही केवळ विभागाची नाही, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी : अध्यक्ष अस्मिता केंद्रे अध्यक्षीय भाषणात अस्मिता केंद्रे म्हणाल्या की, हे अभियान केवळ शासकीय उपक्रमापुरते मर्यादित न राहता, प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाने आरोग्याबाबत सजग राहून पुढाकार घेतल्यास रत्नागिरी जिल्हा निश्चितच आरोग्यसंपन्न बनेल.प्रत्येक विभागाच्या समन्वयातूनच उद्दिष्ट साध्य होईल : मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी स्पष्ट केले, ‘निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते’. कुपोषित बालकांचे आरोग्य, किशोरवयीन मुला-मुलींचे पोषण, असंसर्गजन्य आजारांचे वेळेवर निदान व उपचार, एचपीव्ही लसीकरण आणि शासकीय आरोग्य योजनांचा थेट लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.
कार्यशाळेतील प्रमुख ठळक बाबी----- *कृती आराखडा व रेकॉर्ड कीपिंग: अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गावनिहाय अचूक माहिती संकलन (रेकॉर्ड कीपिंग) व दस्तऐवजीकरण अनिवार्य असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी प्रास्ताविकात सांगितले. *ग्रामपातळीवर जनजागृती: परिसर स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी आणि बालकांच्या पोषणावर भर देऊन पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर अशा कार्यशाळा घेण्याचे आवाहन उपाध्यक्ष विलास चाळके यांनी केले. *तज्ज्ञांचे मार्गदर्शन: राज्यस्तरावरील ए.बी.टी.एस स्वयंसेवी संस्थेचे राजू गुत्ते तसेच कोल्हापूर परिमंडळ पीएमयूच्या प्रीती साबळे व सूरज कांबळे यांनी प्रात्यक्षिकांसह सविस्तर प्रशिक्षण दिले. *पुढील दिशा: जिल्हास्तरीय कार्यशाळेनंतर आता प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करून गावपातळीवर ठोस कृती आराखडा राबवण्यात येणार आहे. या कार्यशाळेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेच्या संयुक्त प्रयत्नांतून रत्नागिरी जिल्हा आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.