loader
Breaking News
Breaking News
Foto

रसिकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न

पनवेल (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पनवेल तालुका पत्रकार विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी माझी देवालाही आवडे’ या संतगीतांच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (१७ ऑक्टोबर) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा सुरेल सोहळा रंगला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पनवेल महानगरपालिकेच्या दशकपूर्तीनिमित्त महापौर नितीन पाटील यांना रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांचाही गौरव करण्यात आला. कल्पिता राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात संतगीते, सुमधुर गायन आणि नृत्याच्या माध्यमातून मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारसा उलगडण्यात आला. डॉ. राम पंडित आणि तन्वी गोरे यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले, तर कल्पिता राणे यांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg