loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरमध्ये सामाजिक बांधिलकीचे दर्शन, अभय भाटकर यांच्या उपस्थितीत आदिवासी वाडीत ‘पालावरची दिवाळी’ उत्साहात साजरी

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील गीमवी गावातील आदिवासी वाडीत 'पालावरची दिवाळी' अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांच्या पुढाकाराने या अनोख्या दिवाळीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी थेट आदिवासी बांधवांच्या पाड्यावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद लुटला. केवळ सदिच्छा न देता, आदिवासी बांधवांना दिवाळीचा फराळ, मिठाई आणि कपड्यांसारख्या विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भेटवस्तू हातात पडताच चिमुकल्यांच्या आणि आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आनंद आणि आपुलकी पोहोचवणे, हाच यामागचा मुख्य उद्देश होता. यावेळी अभय भाटकर यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या आणि अडचणी अतिशय आपुलकीने जाणून घेतल्या, तसेच त्या सोडवण्याचे आश्वासनही दिले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपणारा हा 'पालावरची दिवाळी' उपक्रम सध्या संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg